उस्मानाबाद/प्रतिनिधी-
करण्यात प्रतिबंध केले होते. या आदेशात सुधारणा करुन मुद्रीत माध्यमास लॉकडाऊन मधून सूट दिली आहे. तसेच घरोघरी जावून वृत्तपत्राचे वितरण करावयाचे  झाल्यास  वृत्तपत्र घेणारी व्यक्ती व वृत्तपत्र वितरण करणारी व्यक्ती दोघांनीही मास्कचा आणि हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले पाहिजे.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार यापूर्वी दिलेला आदेश रद्द करुन महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सुधारित आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात घरोघरी  जावून वृत्तपत्राचे वितरण करावयाचे  झाल्यास वृत्तपत्र घेणारी व्यक्ती व वृत्तपत्र वितरण करणारी व्यक्ती दोघांनीही  मास्कचा, स्वच्छ रुमाल आणि हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले पाहिजे, असे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51,महाराष्ट्र कोविड 19 उपायोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यास ते पात्र राहतील.या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ करण्यात यावी.
 
Top