उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 भारत सरकारने कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी  दिनांक 3 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे.
कोरोना विषाणूचा (COVID 19) प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत वैद्यकीय, पशुवैद्यकीय  सेवेसाठी आणि जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी व्यक्तींना खाजगी वाहनांचा वापर करता येईल. (दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती असेल आणि चारचाकी वाहनांच्या बाबतीत चालक व मागील आसनावर एक व्यक्ती असेल.) असे नमुद आहे. तथापि या आदेशाचे अनेक दुचाकीस्वारांकडून उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी असे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे दिले आहेत .
दुचाकीवर चालकाव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती बसलेली आढळून आल्यास 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. या दंडाबाबत कार्यवाही करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था (नगर परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत), संबंधित शासकीय विभागप्रमुख(कार्यालय क्षेत्रामध्ये) आणि पोलीस विभागाला दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. हे आदेश आदेशाच्या दिनांकापासून दि. 3 मे, 2020 पर्यंत लागू राहतील .                                     
 
Top