उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 जिल्ह्यात रेशन वाटपाबाबत    अनेक तक्रारी येत आहेत. गोर गरिबांना रेशनवरील मंजूर गहू , तांदूळ मिळालेे पाहिजे. या गोरगरिबांना रेशनवरील धान्य योग्य पद्धतीने मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही नियम शिथिल केले आहे.   तरीही काही विशिष्ट लोक गरिबांना अडचणी आणत असतील व त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनवरील धान्य मिळू देत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री    शंकरराव गडाख यांनी दिले आहेत.
खरीप आढावा बैठकीस जिल्ह्यातील आमदार , खासदार तसेच कृषि खात्याचे अधिकारी उपस्थित होते . त्यानंतर पालकमंत्री यांनी रेशन वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला . जिल्ह्यातील किती लोकांना वाटप झाले आहे , वाटप कसे चालू आहे , याबाबत सर्व माहिती घेतली व अधिकाऱ्यांना आदेश देतांना सांगितले की माझ्याकडे व लोकप्रतिनिधी यांच्याकडे रेशन वितरणबाबत विविध तक्रारी आल्या आहेत . गोर गरिबांना वितरण होणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी योग्य नियोजन करून गोर गरीब जनतेला वेळेत व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धान्य पुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले .
पालकमंत्री महोदय यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी च्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ चारुशीला देशमुख यांनी उस्मानाबाद शहरामधील खाजानगर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 9 ची आकस्मित तपासणी केली. या तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळून आलेले आहेत, तरी त्यानुसार हया दुकानाचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
 
Top