तुळजापूर/ प्रतिनिधी -
तालुक्यातील अंगणवाडी  व आशाताई यांना  बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूरच्या वतीने 700 मास्कचे  वाटप करण्यात आले. प्रारंभी   बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, तुळजापूरचे प्रबंधक अमित सुतकर  यांनी तुळजापूर तालुका कोरोना निर्मुलन समितीचे समन्वयक   गणेश चादरे व तुळजापूरचे बाल विकास प्रकल्प अधिकार  श्रीकांत हावळे यांच्याकडे हे मास्क सुपूर्द  केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूरच्या क्षेत्रीय प्रबंधक, सुनीता भोसले, क्षेत्रीय उप प्रबंधक  हेमंत महाजन, तुळजापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास पवार, सुधीर सुपनार आदींची उपस्थिती होती.
 
Top