तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर बसवेश्वर जयंती जल्लोषात साजरी न करता आपआपल्या घरीच साधेपणाने  साजरी केली.गेली वीरशैव बांधवांनी आपआपल्या घरी सकाळी श्रीसंत बसवेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
 शिवा संघटनेच्या वतीने शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर कोरे यांच्या घरी श्री संत बसवेश्वर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल अण्णा शेटे  यांची उपस्थिती होती.
 
Top