उस्मानाबाद/प्रतिनिधी-
झारखंड राज्यातील कामगार,मोलमजुरी करून पोट भरण्यासाठी उस्मानाबाद येथे कामानिमित्त आले होते. पण लाॅकडाऊन मुळे काम मिळत नसल्यामुळे हे कामगार उपाशी पोटी परिवारा सोबत राहत आहेत.  त्यातील एक कामगारांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांची भेट घेऊन आम्ही नवरा-बायको आठ जण व पाच लहान लहान मुले काम नसल्यामुळे उपाशी पोटी राहत आहोत अशी अडचण सांगितले आसता तात्काळ दादा कांबळे यांनी या झारखंड राज्यातील कामगार परिवारास गहू,तांदूळ, दाळ,शेंगदाने, तेल आदी किराणा सामानाची मदत केली.
यावेळी  उस्मानाबाद चे तहसीलदार गणेश माळी  व नायाब तहसीलदार  मुस्तफा खोंदे  यांची उपस्थिती होती . ‌ 
 
Top