तुळजापूर / प्रतिनिधी -
कोरोना पार्श्वभूमीवर साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेल्या  अक्षय तृतीय सण  शहरासह परिसरात अंत्यत साध्यापणाने साजरा करण्यात आला. अक्षय तृतीया पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मातेस सकाळी दही, दुध,  पंचामृत अभिषेक केल्यानंतर संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.
इतर वर्षी अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा माञ कोरोना पार्श्वभूमीवर अंत्यत साधेपणाने साजरी करण्यात आली.अक्षय तृतीय पार्श्वभूमीवर खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते ती यंदा झालीच नाही.  अक्षय  तृतीय असुन सुध्दा शहरात सर्वञ बंदीचे वातावरण होते.   श्रीतुळजाभवानी मातेस पुरणपोळी आंब्याचा अंबरस  नैवद्य दाखवुन लोक आंबरस खाण्यास आरंभ करतात. कोरोना लाँकडाऊन  पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आंबा शनिवार व रविवार शहरात न आल्याने व्यापाऱ्यानकडून आंबा जादा दराने घेवुन लोकांनी अक्षय तृतीय साजरी केली
 
Top