तुळजापूर/ तुळजापूर -
कोरोना व लाँकडाऊन पार्श्वभूमीवर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने हमाल व माथाडी कामगारांना कामा अभावी उपासमारीस सामोरे जावे लागत असल्याने  कृषी उत्पन्न बाजार समितीने रेशन व कोरोना पासुन संरक्षण करण्यासाठी मास्क साँनिटायझर साबणाचे वाटप करुन संकटात हमाल मापाडींना दिलासा दिला आहे.
 या जीवनावश्यक साम्रगीचे व रेशन मालाचे वितरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे,  संचालक सुहास सांळुके यांच्या हस्ते  व  सचिव उमेश भोपळे,  सहसचिव कुलदीप पवार,   प्रमोद पडवळ,  सुनिल लोमटे,  प्रगतशील शेतकरी सचिन कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  
 
Top