उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड१९ टेस्टिंग लॅब समिती स्थापन करण्यात आली असून डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांची समिती सदस्य नियुक्ती करण्यात आली.
उस्मानाबाद येथे प्रयोगशाळा, व संशोधन केंद्र स्थापन करून सर्व नागरिकांना कोरोनाची लक्षणे असू,किंवा नसू तरी या लॅब मध्ये कोरोनाची तपासणी करण्यात येणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. दररोज२०० लोकांचे तपासणी करण्यात येईल,
यात डिव्हीपी उद्योग समूहाने खारीचा वाटा म्हणून कोरोनाची लक्षणे तपासणीची उपकरणे या लॅबला देण्याचे ठरले,असून लवकरच लॅब सुरू करण्यात येईल. असे सांगितले.
 
Top