लोहारा/प्रतिनिधी
करोना या वैश्विक जैविक संकटाच्या पार्श्र्वभूमीवर निर्माण होऊ घातलेल्या रक्त तुटवड्याच्या भीतीमुळे गरजूंना रक्त पुरवठा होण्यात अडचण होवू नये म्हणुन या सामाजिक भावना जपत लोहारा तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र पाटील व सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. दापके देशमुख दिग्गज यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तालुक्यातील अचलेर येथे दि. २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, संतोष पाटील, शिवराज सुतार, सुतरेश्वर स्वामी, सुजित मठपती, सिद्धु गोपने, प्रा.  सचिन सोनकटले सर, सुतरय्या मठपती, नागेश स्वामी, संदिप स्वामी, रेवनसिद्ध मठपती, राहुल बंदिछोडे, प्रविण माळगे, बसवलिंग पाटील, प्रभाकर गोगावे, योगिनाथ कलशेट्टी, मल्लिनाथ भुसणे, सुनिल कलशेट्टी, दत्तात्रय कुभांर, गुरु बायस, राजेंद्र पाटील ,निलकंठ कुभार, शंकरय्या स्वामी, बसवराज कणमुसे, शिवशंकर स्वामी, रेवनसिद्ध हविले, अदिती रक्तदान केले. या शिबिरात रक्ताचे संकलन सह्याद्री ब्लड बॕकचे शशिकांत करंजकर, गजानन पाटील, प्रताप चौरे, अशोक गायकवाड, महेश तोडकरी, रणजित नांदे, यांनी केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा लोहारा तालूका अध्यक्ष राजेंद्र पाटील, गुरु बायस , दिनेश बायस, प्रा. सचिन सोनकटले, यांच्यासह अचलेर येथील भाजपा कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.
 
Top