उमरगा / प्रतिनिधी-
 तालुक्यातील जकेकुर येथील जेष्ठ महिला श्रीमती महादेवी गुंडाप्पा जेवळे (७५) यांचे शनिवारी (दि.२५) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीमती महादेवी जेवळे मागील वर्षभरापासून आजाराने त्रस्त होत्या.शनिवारी पहाटे निधन झाले. दुपारी एक वाजता स्वतःच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार सुभाष जेवळे यांच्या त्या मातोश्री होत.
 
Top