परंडा /प्रतिनिधी :-
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी हे प्रसिद्ध श्री क्षेत्र काल भैरवनाथाच देवस्थान आहे.येथे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश तेलंगणा आदी राज्यातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात सध्या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मंदीर पूर्णपणे बंद करण्यात आल्याने भावीक दर्शनासाठी येणं बंद झाल्याने सोनारी इथल्या किमान तीन हजार माकडांना उपाशी राहाव लागत आहे.
सोनारी याच गावचे प्राणीमित्र सचिन सोनारीकर हे गेल्या तीन वर्षांपासून माकडांचे पालन स्वःता करीत आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या भीषण दुष्काळातही सचिन सोनारीकर यांनी पोटच्या लेकरां प्रमाणे माकडांच्या खाद्य व पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
लॉकडाऊनमुळे सध्या उपाशी असलेल्या जवळपास तीन हाजार माकडांची सचिनने ज्वारी, बाजरी, केळी, फुटाने, काकडी, टमाटे आदी खाद्यांची माकडासाठी सोय केली आहे.तरी पण माकडांचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्राणी प्रेमी व दानशूर व्यक्तीने माकडांसाठी खाद्य पुरवठा करण्यासाठी मदत म्हणून पुढे यावे असे आवाहन सोनारीचे सचिन सोनारीकर यांनी केले आहे.
 
Top