उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जिल्हयातील तूर खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर  प्राप्त झाले असून तूर खरेदीस सुरूवात झाली आहे.  अशी माहीती खा.ओमराजे निंबाळकर यानी दिली
उस्मानाबाद जिल्हयात 2019-20 मध्ये एफ.सी.आय मार्फत तूर खरेदी करण्यासाठी 11 खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त उस्मानाबाद, गुंजोटी व कानेगाव या तीनच ठिकाणी ग्रेडर(प्रतिनिधी) पाठविण्यात आले होते. मात्र दि. 20 एप्रील रोजी एफसीआय चे ए.जी.एम, मा. राकेश कुमार रंजन, मुंबई व विभागीय व्यवस्थापक, मा. विनय कुमार पुणे  यांना पत्रव्यवहार केल्यानंतर तात्काळ जिल्हयातील दस्तापूर, नळदुर्ग, कळंब, ढोकी, तुळजापूर व लोहारा येथील खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर (प्रतिनिधी) पाठविण्यात आले असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक श्री विनय कुमार यांनी पत्राद्वारे दिली असून उर्वरीत वाशी व भूम या ठिकाणी देखील तात्काळ टेक्नीकल ग्रेडर पाठविण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील दस्तापूर, नळदुर्ग, कळंब, ढोकी, तुळजापूर व लोहारा या 6 ठिकाणच्या खरेदी केंद्रावर टेक्नीकल ग्रेडर (प्रतिनिधी) प्राप्त झाले असून सदरील ठिकाणी तूर खरेदी सुरू झाली आहे.
 
Top