उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने आश्रम शाळेतील निवारा गृहातील शेकडो बांधवांना मास्क चे वाटप करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून जगभरात कोरोना ( कोव्हिड १९  ) ने थैमान घातले आहे त्यामुळे किमान महिना भरापासून देशात लॉक डाऊन चालू आहे यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात  परप्रांतीय तसेच महाराष्ट्र मधील ही शेकडो बांधव अडकून पडले आहेत.त्यांची प्रशासनाने शिंगोलि, घाटंग्री, बावी येथील आश्रम शाळेत निवारा गृहात   सोय केलेली आहे.या तीनही आश्रम शाळेतील निवारा गृहातील शेकडो बांधवांना तसेच तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कारणास्तव उपशीक्षण अधिकारी (माध्य) दिनकर होळकर व समाज कल्याण कार्यालयाचे लेखा शाखेचे रमेश वाघमारे यांच्या हस्ते मास्क चे वाटप शाळा प्रशासन कडे सुपूर्द करून करण्यात आले.
याकामी नियोजन  प्रदेश संघटक बबनराव वाघमारे सर यांनी केले तर सदरील वाटपासाठी भालचंद्र जाधव, के के कंटेकुरे,प्रवीण केसकर,पुरुषोत्तम माने,अवधूत जगताप, प्रदीप शिंदे, केंद्रे सर यांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभले.
 
Top