उस्मानाबाद / प्रतिनिधी
शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पहिल्या दिवसापासून नगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठीकाणी मास्क न घालणाऱ्या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवारी (दि.१८) शहरात एकूण १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उस्मानाबाद पालिकेने पहिल्या दिवसापासून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या पुढाकारातून विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यानुसारच शनिवारी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या १३ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच यापुढे मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

 
Top