उस्मानाबाद / प्रतिनिधी
शहरातील महावितरण कार्यालयाजवळील देशी दारू दुकानाच्या गोडाऊनमधून सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर शहर पोलिसांनी कारवाई करून तब्बल अडीच लाखाची देशी दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि.१८) करण्यात आली.
प्रभा बिअरबारजवळील देशी दारू दुकानातून अवैधरीत्या दारूविक्री सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने कारवाई करून तेथील गोडाऊनमधून सुरू असलेली दारू विक्री रोखत जवळपास अडीच लाख रुपयांचे ८५ देशी दारूचे बॉक्स जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई कस्तुरे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
 
Top