कळंब (प्रतिनिधी)
संपुर्ण जगावर कोरोना चे संकट सध्या थैमान घालून आहे ,सध्या आपल्या देशासह महाराष्ट्रात या रोगाची लागण झाली आहे राज्यातील लाॅकडाऊन ३० एप्रिल   पर्यंत कायम आहे.हा लाॅकडाऊन पुढे कधीपर्यत चालू राहील काही सांगता येत नाही ,सध्या सगळे जण घरातच आहेत,लाॅकलाऊन असल्यामुळे सगळ्यांना बाहेर पडणे अवघड झाले आहे, स्वत:चा जिव वाचविण्यासाठी प्रत्येकानी काळजी घेतली पाहिजे.शासनाद्वारे चांगल्या प्रकारे कोरोना या संसर्गजन्य आजारांवर जनजागृती चालू आहे ,नाक , तोंडाला रुमाल लावणे ,हात सारखे स्वच्छ धुवणे अशा सुचना दिल्या आहेत ,परंतु सर्वसामान्य व दिन दलित,बहुजन , कामगार, सर्वसामान्य जनतेचे हातावर पोट असणाऱ्या ची उपासमार होत आहे .याची माहिती लाल पॅथर चे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांना माहिती मिळाली . म्हणून कोणीही गरीब , कष्टकरी , कामगार ,उपाशी राहू नये या हेतूने  लाल पॅंथर संघटनेचे अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांच्या सुचनेनुसार लाल पॅंथर च्या वतीने   कळंब तहसिल कार्यालय येथे पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार मा. पठाण मॅडम यांच्या कडे  धान्य देण्यात आले .यावेळी अमर ताटे ,स़दिप वरपे , पोलिस पाटील  भास्कर शिंदे ,राहुल पांचाळ हे उपस्थित होते.

 
Top