उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरातील  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील   शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे एकुण वेतन दोन लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे सोळा रूपये   रक्कम मुख्यमंत्री साह्यता निधीस मदत स्वरूपात देण्यात आले आहे. 
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  मधूकरराव चव्हाण , सचिव  उल्हासदादा बोरगांवकर, रामदादा आलूरे आणि प्राचार्य डॉ.संजय कोरेकर, डाँ कपिल सोनटक्के यांच्या हस्ते  जिल्हाधिकाऱ्यांकडे   सुपूर्द करण्यात आला.यावेळी प्रा.सोनटक्के व अधिक्षक धनंजय पाटील उपस्थित होते

 
Top