कळंब /प्रतिनिधी
क्लासमेट ग्रुपच्या वतीने  दि. २८ एप्रिल रोजी कोरोना संकटात अत्यावश्यक सेवेत जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्धयांना व गरजुवंत नागरीकांना ५०० मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना संकटामध्ये आपल्या ग्रुपतर्फे मास्क वाटप करणे बाबत चर्चा होऊन एकमताने निर्णय घेऊन, कळंब उपजिल्हा रुग्णालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, कळंब बस आगार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वीज वितरण कंपनी, शहरातील पत्रकार बांधव, स्टेट बँक ऑफ इंडिया, जनता बँक तसेच कळंब शहरातील विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना तसेच गोरगरीब महिलांना मास्कचे मोफत वाटप केले. या सोबतच सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बाॅडी टेम्परेचर मशीनच्या सहाय्याने शरीराचे तापमान तपासण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण हातोलकर,  बालाजी पांचाळ, शिवाजी कराळे,किरण टेकाळे, महावीर लोढा तसेच सामाजिक कार्यकर्ते अशोक चोंदे यांनी परिश्रम घेतले.  तसेच भविष्यात देखील असे अनेक लोकपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे  ग्रुपतर्फे सांगण्यात आले.

 
Top