उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी शासनाने लॉकडान लागू केला आहे.उस्मानाबाद नगर परिषदेच्या हद्दीत बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी व वाहरातील नागरिकांना हद्दीबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी नगर परिषदेनेमास्टर प्लॅन तयार केला आहे. शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या प्रवेशद्वारावर नगर परिषदेचे पथक तैनात असणार असून यासाठी पथके नेमण्यात आल्याची माहितीनगराध्यत मकरंदराजे निंबाळकर यांनी दिली.
उस्मानाबाद शहरातील 6 ठिकाणी कर्मचान्यांचे पथक तैनात राहणार असून 43 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सांजा रोड,येडशीरोड, वैरागनाका, बाशी रोड, तुळजापूररोड याभागासह फिरतेराखीव पथक नेमण्यात आले असून याचा आढावा देण्याचे लेखी आदेश नगर परिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनौहरे यांनी दिले आहेत. लाकडाउन असले तरी उस्मानाबाद शहरातील बाजार चौक भागात सौशल डिस्टनसचे तीनतेरा झाले असून नागरिकांची मोठी गर्दी आहे.

 
Top