आशा कार्यकर्तीना वितरणासाठी सुपूर्द केले तीन हजार सॅनिटाझरउस्मानाबाद/प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी येथे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरपंच सत्तार शेख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायद्वारा विविध उपाययोजनांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. यासाठी सरपंच सत्तार शेख हे स्वता जातीने लक्ष घालून विविध यंत्रणेला सूचना देत आहेत. ग्रामपंचायद्वारा १२ हजार ५०० मास्क व सॉनिटाझर चे वितरण लवकरच गावातील प्रत्येक कुटुंबास केले जाणार आहेत . याचाच एक भाग म्हणून सरपंच सत्तार शेख व ग्रामविकास अधिकारी श्री करपे यांच्या हस्ते ३००० हजार सॅनिटाझर वाटपासाठी आशाकार्यकर्तींना सुर्पूद करण्यात आले आहेत.
बेंबळी ग्रामपंचायत द्वारा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जनजागृती तसेच स्वच्छते संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. ग्रामपंचायत द्वारा करण्यात येत असलेल्या या उपाययोजना मुळे बेंबळी गांवातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दुसऱ्यांदा जंतूनाशक औषधांची फवारणी
बेंबळी येथे जंतूससर्ग टाळण्यासाठी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीच्या वतीने जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. यासाठी वैद्यकीय विभागाचे मार्गदर्शन घेण्यात आले. गावात पुणे, मुंबईसह मोठ्या शहरातून नागरिक मोठ्याप्रमाणात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मोठी दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान, अन्य कोणत्या जंतूंमुळे आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रोहित राठोड यांच्या मार्गदर्शनात औषधे मागवण्यात आले. त्यानुसार त्याचे पाण्यात व्यवस्थित मिश्रण करून फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच सत्तार शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेळके, सद्दाम शेख, पोलिस हवालदार कपाळे आदींची उपस्थिती होती.