27 आरोपींना अटक, तीन वाहने जप्त, 13 लाख 96 हजाराचा मुद्देमाल जप्त
  उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 लॉकडाऊनच्या कालावधीत दिनांक 24 मार्च, 2020 पासून दि. 14 एप्रिल, 2020  पर्यंत 21 दिवस जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याची वाहतूक, विक्री व उत्पादन होणार याची दक्षता घेण्यात येते.
या लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 57 गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. त्यामध्ये 27 वारस व 30 बेवारस गुन्हे असून एकूण 27 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. या कार्यवाहीमध्ये एकूण तीन वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच देशी दारु 172 लिटर, हातभट्टी 1142 लिटर, विदेशी दारु 48 लिटर, रसायन 15400 लिटर, विदेशी दारु निर्मिती ब्लॅड 300 लिटर जप्त करण्यात आलेले आहे. त्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 13 लाख 96 हजार 671 रुपये होत आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकारद्वारे दिली आहे.
 
Top