कळबं / प्रतिनिधी
कोरणा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देशभरात सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन मुळे सर्वच घटकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शासन आणि काही खाजगी घटक देखील मदतीला धावले आहेत मात्र बसस्थानकातील भाड्याने दुकाने असलेल्या परिवहन महामंडळाला काय सवलत देणार असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.   राज्यमार्ग परिवहन महामंडळाने या धर्तीवर दोन महिन्याचे भाडे दुकानदाराचे माफ करावे अशी मागणी सर्व अस्थापनाधारकातू होत आहे.
 कोरणा विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन आहे सर्व स्थापना व्यवसायदेखील टाळे लागले आहे सरकारी कार्यालय देखील गरजे पुरते मनुष्यबळ आहे या सर्वाचा परिणाम मात्र संकटावर झाला आहे व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांनी व्यवसायासाठी घेतलेले कर्ज हे रिझर्व बँकेने सर्व बँकांना आदेशित करून तीन महिने कर्ज फेडण्याची मुदत वाढवली आहे असेही त्यांनी आव्हान केल, आहे जे भाडेकरू आहे खाजगी त्यांनाही शासनाने दोन ते तीन महिन्याच्या सवलती दिले आहेत भाडेकरूंना तगादा लावू नये असेही सरकारने आदेश काढले आहेत परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात अनेक भाडेकरू आहेत व्यवसायिक आहेत सरकार या महामंडळाने आपली भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे परिवहन महामंडळाच्या प्रत्येक व स्थानकात रसवंती, बेकरी, फळाचे दुकाने, स्टेशनरी ,पुस्तक दुकान, वृत्तपत्र विक्रेता, सलून ,दूरध्वनी कक्ष, आईस्क्रीम सेंटर ,ब्युटीपार्लर ,अशा अनेक असंख्य दुकाने या  सुरू झाली होती पण या रोगामुळे अनेक धंदे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. 
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या दुकानांची संख्या जवळपास चारशेच्या पार आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा ,लोहारा, तुळजापूर ,कळबं, उस्मानाबाद,भूम, परांडा, अशा अनेक बसस्थानकावर छोटे-मोठे व्यवसायिक आपला धंदा करून आपले पोटपाणी भागवत आहे या विषाणूंचा प्रादुर्भाव यामुळे अनेक व्यवसाय संकटात आले आहेत याच धर्तीवर महामंडळाने किमान दोन महिन्याचे भाडे माफ करून त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी या सर्व अस्थापना धारक आतून होत आहे.
 
Top