कळंब / प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे क्रांती ग्रामसंघाच्या वतीने येथील निराधार, गरीब, व विधवा महीलांना किराणा साहित्याचे वाटप क्रांती ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोणा व्हायरसने धुमाकूळ घतल्याने सद्या लाँकडाऊन परिस्थिती असल्यामुळे येथील अनेक मजुरांना, व महीलांना मजुरी नाही तसेच ज्यांची हातावर पोटे आहेत अशा अनेक नागरीकांना घरगुती समस्यांना सामोरे जावे लागल आहे. तर घरखर्चही भागवणे अनेक कुटुंबांना अवघड झाल्याने त्याची दखल घेत अतिशय गरिब महीलांना व विधवा महीलांना एका कुटुंबाला सर्व वस्तू मिळुण १५किलो किराणा साहीत्य वाटप करण्यात आले.यावेळी क्रांती ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ. सुवर्णा पाटील,जयश्री कुलकर्णी, धनश्री निर्फळ,कवीता देशमाने ,प्रशांत सुरवसे, बलराम कुलकर्णी,ज्ञानेश्वर सुरवसे,या वेळी उपस्थित होते.
 
Top