कळंब/ प्रतिनिधी-
कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे संपूर्ण राज्यातील फोटोग्राफर बांधवांना मोठा फटका बसला आहे कारण ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन (संचार बंदी)करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर लग्न समारंभ राजकीय मेळावे व संस्कृतीत कार्यक्रम बंद असल्यामुळे संपूर्ण राज्यातील फोटोग्राफरवर उपासमारीची वेळ आली आहे याच दोन-तीन महिन्यात फोटोग्राफरचे वार्षिक नियोजन अवलंबून असते खरतर या दिवसाची वाट ते वर्षभर पाहत असतात कारण यावर्षी होणाऱ्या कमाईतून त्यांचे पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन करत असतात यावर्षी  कोरोणा  या महाभयंकर रोगामुळे संपूर्ण राज्यात संचारबंदी असल्यामुळे अनेक जणांनी विवाह सोहळे स्थगित केले तर काहीजणांनी घरच्या घरी विवाह पार पाडला परिणामी केवळ लग्नसराई वर उपजीविका असणाऱ्या फोटोग्राफर बांधवांचे पुढील वार्षिक नियोजन कोड मोडले आहे.
     बऱ्याच फोटोग्राफरने बँकेकडून कर्ज घेऊन अत्याधुनिक कॅमेरे,लेन्स,लाईट अशा बऱ्याच प्रकारचे साहित्य लग्नसराई साठी घेतले होते परंतु फोटोग्राफरचे काम बंद असल्याने ते फारच अडचणीत  असल्यामुळे
त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. मार्चपासून लग्न सराई ला सुरुवात होत असते विवाह सोहळा,प्री-वेडिंग शूटला सुरुवात होते परंतु आता कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये संचार बंदीमुळे फोटोग्राफर बांधवांना काहीच काम नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे आता फोटोग्राफर बांधवांनी करायचे तरी काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे.कोरोना जीवघेण्या रोगामुळे आता चा सीजन वाया गेल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण व त्याचबरोबर मुलाबाळां चे शिक्षण व अत्याधुनिक कॅमेरे या साहित्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची तरी कशी असा प्रश्न फोटोग्राफर बांधवा समोर उभारला आहे.
कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे फोटोग्राफर बांधवासाठी काहीतरी आर्थिक मदत मिळावी असे आव्हान करण्यात आले आहे.

 
Top