उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पेन्शनधारकांबाबत संवेदनशील भूमिका घेऊन निवृत्तीवेतनधारकांना विनाविलंब निवृत्तीवेतन करण्याची भूमिका जाहीर केली.  उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 17 एप्रिल 2020 आदेशान्वये पंचायत समिती सर्व पंचायत समित्यांना मार्च 2020 च्या निवृत्ती वेतनाचे आर्थिक तरतूद केली आहे .
 उस्मानाबाद तालुका सोडून जवळपास सर्व तालुक्यातील पेन्शन धारकांचे निवृत्तिवेतन झाले आहे. परंतु पंचायत समिती उस्मानाबाद याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत सी.ई. ओ .यांच्याकडे संपर्क केला असता निवृत्तीवेतन आधार करणेबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.   पंचायत समिती उस्मानाबाद चे संबंधित सहाय्यक गटविकास अधिकारी, अर्थ विभागाचे अकाउंटंट ,संबंधित पेन्शन क्लर्क यांच्याशी संपर्क साधला असता संभ्रमात टाकणारी  उडवा उडवीची उत्तरे मिळाल्याचे समजते .   दिनांक 29 एप्रिल रोजी दूरध्वनी वरती संपर्क केला असता तेथून अजून बजेत आलेच नाही असे बेजबाबदारपणे उत्तरे देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील  इतर तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर निवृत्ती वेतन जमा होते पण उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत सर्व प्रथम आर्थिक तरतूद आदेश मिळूनही अद्याप वाटप  करण्यात आले नाहीत  या त्यांच्या नाकर्तेपणा मागे कोणता  हेतू दडला आहे हे स्पष्ट होत नाही यामुळे पेन्शन धारकामध्ये   तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  या विलंबाच्या संदर्भाने चौकशीची मागणी करण्यात येत असल्याचे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे हरिभाऊ बनसोडे यांनी सांगितले  
 
Top