परंडा/ प्रतिनिधी -
जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घराबाहेर निघणे अशक्य झाले असून देशात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना रक्तदान करण्याबात विनंती केली होती. परंडा येथे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील मित्र मंडळ व परंडा युवासेनाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यासाठी युवकांना आवाहन केले होते.यास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबीरात १७५ जणांनी आपले रक्तदान केलेआहे.
   परंडा येथील शहरातील पाटील यांच्या विश्वसिध्दी कॉम्लेक्समध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.यात १७५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.संपुर्ण राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असून ग्रामीण भागातही काही वेगळी परिस्थिती नाही. या तुटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला रक्तदान करून ही तूट भरून काढण्याचे आव्हान काही दिवसांपूर्वीच केले होते.  याची दक्षता घेत युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर, हिरारीने भाग घेणारे मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील मित्र मंडळ व परंडा युवासेना यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबीर परंडा शहरातील विश्वसिध्दी कॉम्लेक्स येथे संपन्न झाले.यात संकलन करण्यात आलेल्या बॅग महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गरज भासत असेल तिथे पाठविण्यात येणार असून रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भविष्यात कधीही रक्ताची गरज पडली तर ते त्यांना या रक्तपेढी मार्फ़त मोफत मिळणार असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.
 यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जयकुमार जैन मालक, जि.प.सदस्य सौ कांचनताई संघवे, ( शिराढोण ) सेनेचे युवानेते रणजित ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक ईस्माईल कुरेशी, नगरसेवक मकरंद जोशी, नगरसेवक आब्बास मुजावर, भाजपा अॅड. जहीर चौधरी, समीर पठाण,विनोद साळवे, दत्ता मेहेर, संतोष गायकवाड , प्रशांत गायकवाड, धिरज हिवरे, वैभव सांगडे किरण शिंदे, आकाश सुर्यवंशी, मयुर शहाणे,अरूप अजय कुमार आदी उपस्थित होते.
 
Top