लोहारा/प्रतिनिधी
 देशात व राज्यात कोरण्याच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे दक्षता घेण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या आदेशानुसार सामाजिक भावना जपत भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यावतीने  तालुक्यातील अचलेर येथे सॅनिटायझर व मास्कचे वाटप करुन ब्लिचिंग स्प्रे करण्यात आले.
यामुळे नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, अमोल पुजारी शरद पुजारी, बाला सिंग बायस, भीम पाटील, किरण माल, गुरूसिंग बायस, संतोष पाटील, दिलीप पुजारी आदीं  उपस्थित होते.

 
Top