कळंब/ प्रतिनिधी - कोरोना माहामारी रोखण्यासाठी सर्वजन आपापल्या परीने जमेल तसे प्रयत्न करित आहेत. डॉक्टर्स मंडळी ना आरोग्य सेवा देताना खुप मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. येणारा पेशंट कोणता आजार घेऊन येतो आणि तो कोरोना बाधित नसेल याची खात्री देता येत नाही. पेशंट तपासताना डॉक्टर्स नी स्वसंरक्षण किट्स वापरणे खूप गरजेचे आहे. सध्या कोरोना माहामारी मुळे या किट्स ची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवत आहे. हि समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस ने पुढाकार घेतला असून कळंब शहरातील ७५ डॉक्टर्सना फेस शिल्डस् चे वाटप केले.
दि २८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी   काँग्रेस डॉक्टर्स सेल चे उस्मानाबाद जिल्हा प्रभारी डॉ अविनाश तांबारे, कळंब शहर प्रमुख श्री शंतनू खंदारे, न प गटनेते श्रीधर भवर, श्री मिर्झा, अॅड प्रविण यादव, महाराष्ट्र राज्य शाखा आय एम ए चे प्रेसिडेंट ईलेक्ट डॉ रामकृष्ण लोंढे यांचे प्रमुख उपस्थितीत फेस शिल्डस चे वाटप करण्यात आले.
यावेळी आय एम ए कळंब शाखाध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, डेंटिस्ट संघटनेचे डॉ अमित पाटील, केटीएमपिए चे अध्यक्ष डॉ अभिजीत जाधवर,  डॉ अभिजीत लोंढे, डॉ भवर. डॉ सचिन पवार, डॉ गिरीश कुलकर्णी आदीं  उपस्थित होते. या वेळी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी डॉक्टर्स नी स्वसंरक्षण किट्स चा वापर करणे, सोसल डिस्टेंसिग चे पालन आणि सॅनटायजर चा वापर या त्रिसूत्री चा अवलंब करावा असे आवाहन डॉ रामकृष्ण लोंढे यांनी केले. तसेच डॉक्टर्स ना फेस शिल्डस पुरविल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस  चे आभार व्यक्त करण्यात आले.
 
Top