उस्मानाबाद  / प्रतिनिधी -
कोरोना वायरस मुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन केल्यामुळे अनेक जिल्हयात परप्रांतीय नागरिक आडकले आहेत. त्यामुळे १४ एप्रील रोजी लॉकडाऊन बंद झाल्यानंतर किंवा दोन दिवस कर्फ्यू शितील करून वैद्यकीय प्रमाणपत्र असलेले नागरिकांना त्याच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्ताद्वारे राज्य सरकारला केली आहे.
उस्मानाबाद जिल्हयात पुणे-मुंबईवरून आलेल्या ६६ हजार लोकांची कोरोना वैद्यकीय तपासणी केली आहे. या सगळयाचा निगेटीव्ह रिपोर्ट आला आहे. जिल्हयात फक्त तीनच कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आहेत तर एका रूग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत .
वाढत्या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव पाहून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊन वाढविण्या संदर्भात किंवा कमी करण्यासंदर्भात कांही सूचना मागविल्या आहेत. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारा विभागीय आयुक्ताबरोबर झालेल्या चर्चेत कोरोना वॉयरस नीगेटीव्ह वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी दोन दिवस कर्फ्यू शितील करण्याव यावा . उस्मानाबाद जिल्हयात परराज्यातील १० हजार लेबर आडकून पडले असून त्यांची प्रशासनाच्या वतीने सोय करण्यात आली आहे . परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी भोजन व अन्य सुविधा देण्यासाठी तेरा कॅम्प आहेत . तर परप्रांतीय मजुरांसाठी भोजन व अन्य सुविधा देण्यासाठी  २६ कॉम्प लावले आहेत .
जिल्हयाची एकुण १६ लाख लोकसंख्या असून साडेचौदा लाख रेशनकार्ड धारक असल्याने त्यांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळत आहे. तर उर्वरीत दीढ लाख लोकांसाठी आधार कार्ड ग्राह्यधरून अन्यधान्य वितरीत करण्यात येईल, अशी मािहती अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी दिली.
डी मार्ट चालु करण्याचा प्रयत्न
उस्मानाबाद शहरातील डी मार्टची सेवा चालू करण्यासाठी जिल्हा प्रशासन परवानगी देत आहे . ही परवानगी कांही आटींच्या आधीन राहून देत असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री . यादव यांनी सांगितले . डी मार्ट चे ऑप डॉऊनलोड केल्यानंतर अनेकांना घरपोच सेवा ही मिळू शकते

 
Top