उस्मानाबाद/ प्रतिनिधी
देशात भूकंप व अन्य नैसर्गीक संकट समयी मोठया प्रमाणात मदतीसाठी धावून येतात, त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी होतो, गेल्या २३ मार्च पासून रूपामाता उदयोग परिवाराच्या वतीने चालू केलेला मदतीचा हाथ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत अप्पर जिल्हाधिकारी गिरीष यादव यांनी बोलताना व्यक्त केले .
केरळ, आध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील आडकलेल्या विद्यार्थ्यांना फुड पॉकीट वितरणाचे काम रूपामाता उदयोग समूहा मार्फत होत आहे, अशा अडचणीच्या काळात लोक मदतीला धावुन येत असून, अशा लोकांमुळेच प्रशासनावरील ताण कमी होतो. रूपामाता परिवाराच्या वतीने दररोज शिंगोली आश्रमशाळा, बायपास रोड - गॅस पंपाजवळील २५ मजुर परिवार व सांजा रोडवरील वैद्यु बहरूपी समाज यांना ही फुट पॉकेटचे वितरण केले जाते. हे वितरण लॉकडाऊन संपेपर्यंत करणार असल्याचे अॅड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले
 यावेळी जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, रूपामाता उद्योग समुहाचे अॅड व्यंकटराव गुंड, संचालक राजाभाऊ वैद्य, अँड. अिजत गुंड, मिलींद खाडेकर, सोमेश्वर शिंदे, हर्षल मोहिते आदी उपस्थित होते.
 
Top