तुळजापूर/ प्रतिनिधी-
तुळजापूर-येथील  उपजिल्हा रुग्णालयात कोरोना क्वारंटाईन कक्षात ठेवलेल्या  चाळीस वर्षीय इसम पळुन गेला होता, माञ त्याला अवघ्या सहा तासात पाचोड येथे ताब्यात घेवुन त्यास औरंगाबाद येथील मिनी घाटी रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले, तिथे त्याची तपासणी करण्यात आली असुन रिपोर्ट आल्यानंतर तो निगेटीव्ह की पाँजिटीव्ह हे स्पष्ट होणार आहे. सदरील इसम पकडल्याने  पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी की,  टँकर चालक सोहेल रहमान सय्यद (40) यास तुळजापूर उप जिल्हा रुग्णालयात कोरोना क्वारंटाईन कक्षात वैद्यकीय पथकाच्या निगरानीत ठेवण्यात आलेले होते.सदरील टँकर चालक सोमवारी दि. 6 रोजी  पहाटे 4.30 वा. दवाखाना सुरक्षा रक्षकांना लघवीला जातो म्हणून गेलो परंतु तो तेथुन परत न आल्याने याची माहीती पोलिस स्टेशनला कळविण्यात आली. त्यांनतर उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. दिलीप टिपरसे यांनी उपजिल्हारुग्णालय गेले याचे फोटो व मोबईल नंबर पोलिसांनी घेतला होता याचा आधार घेत याची माहीती तुळजापूर औरंगाबाद वर असणाऱ्या चेक पाँंईटला दिली . यावेळी एपीआय येरमे यांना यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. टँकर वाहन अत्यावश्यक सेवेत येते याचा फायदा घेत तो पाचोड येथे पोहचला असता त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले तो खोटे बोलु लागला असता फोटो पाठवलो माञ तो मास्क घातलेला असल्याने नंतर  त्याचे ओळख पञ अंगठी मोबाईल  वरुन त्याची ओळख पटवून त्यास औरंगाबाद येथील मिनी घाटी रुग्णालयात रवानगी करुन त्याची तपासणी केली असुन रिपोर्ट आल्यावर तो कोरोना पाँझेटिव्ह कि निगेटीव्ह हे स्पष्ट होणार आहे
माञ वेळीच पोलिस खात्याने युध्द पातळीवर उपाययोजना केल्यानेच तो  हाती लागला. टँकर चालक  नमुद व्यक्तीने वैद्यकीय उपचारांना जाणीवपुर्वक, निष्काळजीपणे टाळून कोरोना संसर्ग पसरण्याच्या कारणास जबाबदार होण्याची कृती केली आहे. अशा मजकुराच्या डॉ. दिगंबर कमठाणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 अन्वये गुन्हा दि. 06.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

 
Top