उस्मानाबाद/प्रतिनिधी
केंरळ, आंध्र, तेलंगणा या राज्यातील एकुण ४०० विद्यार्थी उस्मानाबाद जिल्हयात आडकून पडले आहेत . त्यापैकी शिंगोली आश्रम शाळा व संत गोरोबाकाकानगर येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची सोय प्रशासनाने रूपामाता उद्योग समूहाकडे सोपविली आहे. या केंद्रास पोलिस अधिक्षक राजरोशन तिलक यांनी बुधवार दि.८ एप्रील रोजी भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी रूपामाता समुहाचे अध्यक्ष अॅड व्यंकटराव गुंड यांनी सविस्तर माहिती दिली.
कोरोना व्हायरस मुळे सरकार ने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर केरळ, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातील ४०० विद्यार्थी उस्मानाबाद शहरात कृषी आभ्यासक्रमासाठी आले असता ते येथे अडकून पडले. अशा आणीबानीच्या परिस्थितीमध्ये ज्या संस्थेने या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी पाठविले होते, त्या संस्थ्ेनेच या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हे विद्यार्थी अडचणीत सापडले होते . जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर भोजन व्यवस्था रूपामाता उद्योग समुहाकडे सोपविण्यात आली . गेल्या २५ मार्च पासून रूपामाता उद्योग समूहाच्या वतीने या विद्यार्थ्यांना फूड पाॅकीटचे वितरण करण्यात येत आहे. बुधवारी फुड पॉकीटचे वितरण करताना पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले .
यावेळी अँड व्यंकटराव गुंड, डीवायएसपी राठोड, संचालक राजाभाऊ वैद्य, अॅड अजीत गुंड, गट शिक्षण विस्तार अधिकारी दैवशाला हाके, मिलींद खांडेकर, महसूल विभागाचे गोकुळदास शिंदे, हर्षल मोहिते, गणेश खराडे आदी उपस्थित होते.
एक हाथ मदतीचा
रूपामाता उद्योग समूहाच्या वतीने भोजनाच्या वाटप होत असल्याचे समजल्यानंतर श्रीकृष्ण भोसले यांनी उस्मानाबाद शहरातील बायपास गॅस पंपाजवळ २५ ते ३० मुजदारांचे कुटुंब या लॉकडाऊनमुळे उपासमारीच्या संकटात सापडले होते. भोसले यंानी सदर माहिती रूपामाता परिवाराला दिल्यानंतर या मजुर परिवारांना फुड पॉकेटचे वाटप करण्यात आले .