उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात दोन ड्रोन दाखल झाले असून यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे. संचारबंदी काळात अनेक लोक जाणीवपुर्वक घरा बाहेर पडून संचारबंदीचा भंग करतात. पोलीसांची चाहूल लागताच पळून जातात. अशा लोकांवर नजर ठेवण्यासाठी उस्मानाबाद पोलीस दलात उच्च दर्जाचा कॅमेरा असलेली दोन ड्रोन दाखल झाली आहेत.
500 मी. उंची पर्यत व सुमारे 8 कि.मी. अंतरा पर्यंत रिमोट कंट्रोलने त्यांना हाताळता येणार आहे. या ड्रोन कॅमेऱ्याने घेतलेली छायाचित्रे चित्रमुद्रण संगणकावर पाहण्याची सोय असुन त्याद्वारे गर्दीची ठिकाणे,मुख्य रस्ते इत्यादीवर देखरेख केली जाणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.

 
Top