उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 गणित विषयातील कठीण संबोध स्पष्ट व्हावेत व शिक्षकाला गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील व बाहेरील होतकरू शिक्षक व शिक्षण विभागातील काही अधिकारी यांनी गणित अध्यापक मंडळ या व्हाट्सअप ग्रुपची निर्मिती केली. या ग्रुप मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५० हजाराची मदत करण्यात आली.
हा मदतीचा निधी उस्मानाबाद जिल्हयाची जिल्हाधिकारी डॉ.  दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे सुपूर्द  करण्यात आला. यावेळी  ग्रुपचे सदस्य शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने, प्रवीण बनकर व सुरेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. 
 
Top