उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर वॉरिअर्स म्हणून अविरतपणे काम करणाऱ्या बेंबळी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना बेंबळी दक्षता समितीच्या वतीने मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले.‌ कोरोना आजाराचे सावट असेपर्यंत त्यांना सातत्याने साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बेंबळी दक्षता समितीच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, डॉ. रोहित राठोड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना साहित्य देण्यात आले.
यासाठी समितीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते गालिब पठाण, रणजित बरडे, पत्रकार शितलकुमार शिंदे, नितिन खापरे, बालाजी माने, गाेविंद पाटील, सुनिल वेदपाठक, अमर कटके आदींनी पुढाकार घेतला. यावेळी लागतील तेवढे मास्क व सॅनिटायझर वितरीत करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पठाण यांनी सांगितले. विशेष म्हणजे बेंबळी गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असूनही कोणत्याच सामाजिक संस्था अथवा  राजकीय नेत्याकडून स्वखर्चाने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साहित्याचे वितरण करण्यात आलेले नाही. मात्र, समितीचे गालिब पठाण यांनी स्वखर्चातून सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 
Top