उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा परिषद यांनी २०१२ या शैक्षणिक वर्षापासुन जि.प. च्या १०४१ प्राथमीक शाळेमध्ये सेमी इंग्रजी चालु केली आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमी इंग्रजी चालु केल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची चांगली संधी निर्माण होवुन विनामुल्य शिक्षण मिळत असल्याने पालकांचा मुलावर होणारा शैक्षणिक खर्च अंत्यत कमी होत असुन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनता सेमी इंग्रजी या निर्णयामुळे समाधानी व खुष आहेत. त्यामुळे सेमी इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन शैक्षणीक साहित्य उपलब्ध करा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेमी इंग्रजी हा विषय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुरु केल्याने इंग्रजी, विज्ञान व गणित या विषयाची मुलामध्ये असलेली भिती संपली असुन त्याची आवड निर्माण झाली आहे यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याच्यां पटसंखेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असुन विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मधील शिक्षकांचे अतिरीक्त पदाची संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत अंत्यत कमी आहे.
या वर्षी चालु होणाऱ्या शैक्षणीक वर्षामध्ये जिल्ह्यातील सेमी इंग्रजी वर्गातील मुले ८ वी च्या वर्गात जात आहेत त्यामुळे चालु शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला सेमी इंग्रजी (इंग्रजी, विज्ञान व गणित) या विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. प्रशिक्षणामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना सोप्या पध्दतीने शिकवण्यास मदत होवुन शिक्षकांना शिकवताना येणाऱ्या अडचणीही दुर होणार आहेत. तसेच शैक्षणिक पुस्तके व साहित्य लवकर उपलब्ध झाल्यामुळे शिक्षकांना शिकवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दुर होणार आहेत. तरी वरील प्रशिक्षण व शैक्षणिक साहित्याबद्दल लवकरात लवकर कार्यवाही होवून अमलबजावणी व्हावी.
येत्या शैक्षणिक वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे नुकसान टाळण्यासाठी वरीलबाबी पुर्ण करण्यासाठी आपण जिल्हा परिषदेला आदेश द्यावेत, अशी मागणी संजय पाटील-दुधगावंकर यांनी केली आहे.

 
Top