उमरगा / प्रतिनिधी -
धानुरी, ता. लोहारा येथील कोरोना रोग ग्रस्त व्यक्तीवर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे वैद्यकीय उपचार चालू आहे. त्याचा संसर्ग इतरांना होउ नये म्हणुन त्यास  स्वतंत्र विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले आहे. उपचारा दरम्यान त्याने इतरांशी संपर्क टाळने गरजेचे आहे. असे असतांनाही तो जाणीवपुर्वक आयसोलेशन वॉर्ड सोडून बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतो, गुळण्या करुन थुंकतो. त्यास वैद्यकीय पथकाने अनेकदा समजाउन सांगीतले तरी तो त्या कडे दुर्लक्ष  करुन जाणीवपुर्वक गैरवर्तन करत आहे. त्याच्या या गैरवर्तनुकीमुळे कोरोना आजाराचा संसर्ग इतरांना होउ शकतो. अशा मजकुराच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज सिद्रामप्पा दानाई यांच्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा दि. 07.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top