ढोकी/प्रतिननिधी:-
जगभर जोमाने धुमाकुळ घातलेल्या कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव करण्यासाठी ढोकी ता उस्मानाबाद येथील पोलिस पाटलांने स्वतहाच्या दुचाकीला स्पिकर लावुन आलोसिंग करत गावभर फिरुन  नागरिकांना घरात बसा कोराना टाळा , घराच्या बाहेर विनाकारण पडु नका असे आवाहन करित असल्यामुळे पाटलांचे कौतुक होत आहे.
 या पाटलाचा आर्दश जिल्यातील  पोलिस पाटील घेतील का ?
उस्मानाबाद  तालुक्यातील  सर्वात लोकसंख्येने मोठे असलेले तसेच राजकीय आखाड्याचा केंद्रबिंदु म्हणुन ओळखले जाणां-या ढोकी गांवात कोरोना या विषाणुजन्य रोगा पासुन मुक्त ठेवण्याचा मनात निर्धार ठेवुन  सामाजिक सांस्कृतिक व अत्याधिमिक कार्यक्रंमात अग्रेसर तसेच संत गोरोबा काका तेरला वारकरी दिंडी सुरु करणारे कर्तव्यदक्ष पोलिस पाटील राहुल माणिकराव वाकुरे यांनी स्वतहाची  दुचाकीला लाऊसस्पिकर लावुन  गावातील  शिराज मुल्ला  हे दुचाकी चालवतात तर पाटील हे माईकवरुन गावातील ग्रामस्थांना  आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,  सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या पार्शभुमीवर सर्व देशात लाॅकडाऊन सुरु आहे. या कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे तसेच संचारबंदी लागु केल्याने नागरिकांना कसलेच गांर्भिय नसल्याने व जगासमोर कोरोना संकट किती भयानक आहे याचे वास्तव, एकाच दिवशी हजारो नागरिक मरतात त्यांना थेट जेसीबीच्या साह्याने गाडले जाते याचे भान असु द्या तसेच त्या प्रगत आरोग्य यंञणा मजबुत आसुन देखील कमी पडत आहे  आपल्या भारतात तेवढी आरोग्य यंञणा प्रभावी नाही त्यामुळे सर्व नागरिकांना गांव कोरोना मुक्त ठेवण्याचा  कोरोनाचा फैलाव करण्यासाठी घरात बसा , विनाकारण घराबाहेर पडु नका,प्रशासनाचे नियम पाळा,तसेच सुज्ञ नागरिकांना आव्हांन केले जे नागरिक , तरुण युवक डांबरट पणा करतात अशांची यादी मला द्या त्यांच्यावर ढोकी पोलिस ठाण्यामध्ये नांवे दिली जातील व कार्यवाही केली जाणार आहे अशी विनंती पाटील सकाळ दुपार व सायकांळी गल्ली बोळात जाऊन लाऊसस्पिकर आॅलासिंग करुन आवाहन करित आहेत तसेच वेळोवेळी प्रशासनाचे विविध सुचना किराणा दुकान,रेशन दुकान,भाजीपाला तसेच जिवनावश्यक वस्तुचे नियोजन करत आहेत गावातील गोरगरीब व निराधार लोकांना विविध संस्थेला जिवनावश्यक वस्तुची मदत करण्याचे आव्हांन करित आहेत दिलेली मदत योग्य व्यक्तीला मिळते का यावर करडी नजर ठेवुन आहेत अशा भयंकर परस्थीती आपले गांव कोरोनामुक्त ठेवण्याचा मनात निर्धार ठेवला असल्याचे पोलिस पाटील वाकुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले या पोलिस पाटलाचा आर्दश जिल्यातील पाटील घेतील का?
 
Top