उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजाई नगरीत कर्नाटकातील २१ कन्या सुरक्षित ! तुळजापूर -कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमीवर लातूर येथील जाँब बंद पडल्याने पायी चालत तुळजापूर कडे  येणाऱ्या कर्नाटक राज्यातील २१ मुलींना प्रशासणाने आपुलकीने विचारपुस करुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांना येथील निवारागृहात ठेवले आहे.
प्रशाषाणाने परराज्यातील मुलीसाठी दाखवलेली माणुसकी मुळे आज या मुली स्ञीशक्ती देवते दारी सुरक्षित आहेत. या बाबतीत अधिक माहीतीअशीकी कर्नाटकातील ऐकवीस मुले लातूर येथे जाँब करीत होत्या जाँब कोरोना मुळे गेल्याने या घाबरलेल्या २१ मुलीनी टँम्पोतुन  स्ञीशक्ती देवता श्रीतुळजाभवानी दारी जाण्याचा निश्चय करुन टँम्पोतुन तुळजापूर कडे निघाल्या तुळजापूर जवळ पोलिसांची चेकपोस्ट टँम्पो दिसताच उगीच लफडे नको म्हणून टंम्पो  चालकाने मुलीना खाली उतरुन पळ काढला त्यानंतर या ऐकवीस मुले तुळजापूर कडे चालत निघाल्याने प्रशाषणातील मंडळीनी यांची आपुलकिने विचार पुस करुन चौकशी केली असता जाँब गेल्याने या आश्रय साठी देवीदरी येत असल्याचे स्पष्ट झाल्याने यांना श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थान संचलित श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालयचा होस्टेल मध्ये या मुलीसाठी खास निवारा कक्ष  नव्याने तयार करण्यात आलेला आहे या  निवारागृहात  पाच दिवसापासून येथे वास्तव्यास असुन येथे त्यांना नाष्टा भोजन सह करमणुकीसाठी कँरम टीव्ही दिला असुन त्यांना मुलभुत सुविधा पुरवल्या जात या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचा प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे नगराध्यक्ष सचिन रोचकरी व प्राध्यापक मंडळी नी उपलब्ध करुन दिल्या  आहेत.
या  घाबरलेल्या मुलींची मानसिकता आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून योग शिक्षक संजय बोंदर व त्यांची मुलगी श्रध्दा  यांना सकाळी योगासने शिकवीत आहे. सध्या यामुली पुर्णता सुरक्षित आहेत. सदरील मुलींना आम्ही लातूर रस्त्यावरून पायी चालत येत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेवुन त्यांना सर्वसुविधा पुरवल्या आहेत या मुली सुरक्षित असल्याने शाषणाचा निर्दशानंतर या मुलींन बाबतीत काय करायाचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याची,
प्रतिक्रिया तहसिलदार सौदागर तांदळे यांनी दिली.

 
Top