
येथील नगरसेवक अभिजित कदम यांनी कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे हातचा रोजगार निघून गेल्यामुळे शहरातील गरजूंना मदतीचा हात म्हणून स्वखर्चाने अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.
यावेळी नगरसेवक अभिजीत कदम यांच्या वतीने ज्वारी व किराना मालाचे वाटप करताना माजी नगराध्यक्ष खलील शेख, किसनराव कदम,बंटी अपराध, राहुल कदम रियाज शेख यशवंत कांबळे,दत्ता शिंदे आदी उपस्थित होते.