परंडा /प्रतिनिधी  -
येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये दिनांक 12 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान तीन दिवसाच्या ऑनलाइन वेबीनार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.ही कार्यशाळा दिनांक 14 रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेचे आयोजन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि सोफ्टेक सोल्युशनस सर्विसेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्यातील 140 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला होता.या कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ.वीर आणि डॉ.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र सुरू करण्यात आले होते.या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी या कार्यशाळेची सविस्तर माहिती देऊन ग्रंथालय विषयी पूर्ण सविस्तर माहिती देऊन सहकार्य दर्शविले त्यांनी ग्रंथालयाचा इतिहास जुने ग्रंथपाल, ग्रंथपालाची स्थिती त्यांचे कार्य आणि आजची आधुनिक ग्रंथालय व ग्रंथालया मध्ये बदल कसा झाला याविषयी तसेच या कार्यशाळेचे महत्त्व सांगून कार्यशाळेमध्ये व्याख्याने दिलेल्या व्याख्येत्यांचे  आभार आणि अभिनंदन केले.तसेच ग्रंथालयाशी निगडित असलेल्या डॉ ताकसांडे प्रतिभा  यांनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलंकारिक शब्दाच्या रूपाने सर्वांची मने जिंकून थोडक्यात परंतु उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
    हे मार्गदर्शन अतिशय हृदयस्पर्शी असे होते.तर जालना येथील राज्याचे मंत्री राजेश टोपे यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे यांनी L10 ते L 14 पर्यंत एक अति उच्च दर्जाचे कुठेही कोणाला विचारून सुद्धा माहिती मिळणार नाही अशी प्लेसमेंट साठी लागणारी माहिती देऊन प्लेसमेंट काय असते व त्यासाठी सामोरे कसे जायचे याची अतिशय सुटसुटीत समजणारी माहिती देऊन  सर्वांची मने जिंकली.त्यानंतर प्रल्हाद जाधव सर यांनी व्हाय डाटा  मॅनेजमेंट ,के एम  vs पी के एम ,के एम ,आणि पि के एम इन लायब्ररी या विषयावर बहुमोल असे  मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रांमध्ये डॉक्टर धर्मापुरीकर यांनी ऍडमिनिस्ट्रेशन लिस्ट फोर कॉलेज लायब्ररी या विषयाचे मोलाचे मार्गदर्शन करून एन लिस्ट विषयी असणाऱ्या शंका दूर केल्या.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.राजेंद्र कुंभार यांनी केले.या तीन दिवसाच्या कार्यशाळेसाठी गेल्या दहा दिवसापासून आयोजन करणारे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.राहुल देशमुख त्यांचे सहकारी संचालक चेतन टाकसाळे ,इद्रीस खान यांनीसुद्धा या कार्यशाळेस खूप सहकार्य केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी सर्वाचेअभिनंदन केले.

 
Top