उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कमलेश सतिश हजारे वय 32 वर्ष रा.काटगाव ता.तुळजापूर यांनी दि.21 मार्च 2020 रोजी पोस्टे हजर दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 17 मार्च 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजताचे सुमारास मेव्हणी कु.राजनंदिनी रणधीर पाटील वय 17 वर्ष रा.कोंड ता.जि.उस्मानाबाद हीस काटगाव येथून कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन फुस लावून पळवून घेवून गेला आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुध्द कार्यवाही होण्यासाठी गुर नं.75 / 2020 कलम 363 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे.
पिडीत मुलीचे नाव व पत्ता : नाव-कु.राजनंदिनी रणधीर पाटील, वय 17 वर्ष, व्यवसाय-शिक्षण, उंची-अंदाजे साडेचार ते पाच फुट, रंग-सावळा, केस-लांब काळे (वेणी घातलेली), चेहरा-उभट, नाक-सरळ, कपडे-जांभळ्या रंगाचा लेडीज टॉप व काळ्या रंगाची जिन्स लेडीज पॅन्ट, भाषा-मराठी, रजपूत, इतर-सोबत आधार कार्ड व एमटीएम कार्ड असा तपशील आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-पोलीस ठाणे नळदुर्ग-02471-246033 व श्री. के. एस. लहाने पोलीस उपनिरिक्षक, 9158898385 येथे संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उप निरिक्षक, पोलीस स्टेशन, नळदुर्ग यांनी केले आहे.

 
Top