उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना लाॅकडाऊन च्या काळात शेती कामासाठी शेतकरी व मजुरांना अटकाव करू नये तसेच ग्रामीण भागात रात्री सिंगल फेज वीज पुरवठा करावा अशी मागणी भाजपाचे आ. सुजितिसंह ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.
अा.ठाकूर यंानी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  सध्या शेतात  रबी हंगामातील पिकांची काढणी, मोडणी, मळणी, खळी, या सुगीच्या आणि पावसाळापूर्व नांगरणी, मोगडणी, वखरणी आदी कामांना शेतकरी व मजुरांना अटकाव करू नये. तसेच लाॅकडाऊन काळात लोक कुटुंबासह शेतात, वाडी- वस्तीवर रहावयास गेल्याने ग्रामीण भागात रात्रीचा सिंगल फेज वीज पुरवठासुरू ठेवावा.  अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
 
Top