उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ बीटमधील शिक्षकांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंगरुळ बीटमधील २३ गावातील ११६ गरजू कुटुंबांना प्रत्येकी ५०० रुपये किंमतीच्या किराणा मालाच्या कीट वाटप केल्या. तसेच नळदुर्ग येथे बाहेर राज्यातून आलेल्या स्थलांतरित ४५ मजुरांना अन्नधान्यांचे वाटप केले.
प्रातिनिधिक स्वरूपात मंगरूळ येथे नायब तहसीलदार संदीप जाधव, गटशिक्षणाधिकार अर्जुन जाधव, पंचायत समितीचे उपसभापती चितरंजन सरडे, शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख संजय वाले आदींच्या उपस्थितीत या कीट वाटप करण्यात आल्या. उर्वरित कीट गरजूंच्या घरी जाऊन वाटप करण्यात आल्या. तसेच नळदुर्ग हद्दीमध्ये स्थलांतरित होऊन आलेल्या ४५ मजुरांना आवश्यक त्या अन्नधान्याचे वाटप स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले. कीट खरेदीसाठी बीटमधील १२२ शिक्षकांनी ६५ हजार रुपये जमा केले होते. याच्या नियोजनासाठी येवतीचे केंद्रप्रमुख विठ्ठल गायकवाड, नांदुरीचे संजय वाले, केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी साखरे, शिक्षक बापूराव मोरे, सुसेन सुरवसे, सदाशिव शिंदे, चंद्रकांत उळेकर, दळवी, प्रमोद चौधरी, काशिनाथ धर्मे, उमेश सुर्वे, प्रशांत गायकवाड, दिलीप चव्हाण, संतोष पाटील, राजाभाऊ क्षीरसागर, सुखदेव भालेकर, नागनाथ वडणे, ज्ञानेश्वर घोडके आदींनी पुढाकार घेतला.

 
Top