उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्याचे नेते आमदार  राणाजगजितसिंहजी पाटील  व विधान परिषद आमदार सुजितसिंहजी ठाकुर यांच्या संकल्पनेतुन, भाजप नेते अजित दादा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या उपक्रमा १० दिवस पुर्ण झाले आहेत . या उपक्रमांतर्गत शहरातील पोलीस बांधव, न.प कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी कर्मचारी तसेच गरजू नागरिक यांना जागेवर जाऊन जेवण देण्यात आले.
यावेळी अरुण काका चौधरी, शहराध्यक्ष भैय्या बावीकर, माणिक बोंदर, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य गणेश त्रिवेदी, युवा नेते प्रशांत लोमटे, अब्दुल मुलानी, अभय गायकवाड, राहुल चोंदे, बबलू ठोंबरे, राजाभाऊ टोपे, इम्रान मुल्ला, मनोज पांचाळ, रणजीत चंदनशिवे, खय्युम सय्यद आदि उपस्थित होते. कळंब शहरातील नागरीकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी या उपक्रमास सहकार्य करावे, तुमचे योगदान आपल्याच गावातील प्रत्येक गरजुची भूख भागवेल, तसेच आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस, जिवाची बाजी लावत आसलेले वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, यांना ही तुमच्या मदतीने भोजनाचे सहकार्य होणार आहे. 
 
Top