नळदुर्ग / प्रतिनिधी-
 वारंवार सांगुनही लॉकडाऊनच्या काळात विनाकारण मोटारसायकल घेऊन रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोराना आळा घालण्यासाठी तसेच मुंबई व पुणे येथील नागरीक मोठयसंख्येने शहरात विनापरवाना येत असल्याने त्यांना मज्जाव करण्यासाठी न.प.प्रशासनाने दि.१८ एप्रिल रोजी संपुर्ण शहर लोकडाऊन केले आहे. गल्ली बोळातील रस्ते तसेच शहरात येणारे प्रमुख रस्ते लाकडी दंटे लाऊन बंद करून टाकले आहेत., विनाकारण रस्त्यावर फिरणे तसेच तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्यावर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच सरकारने हा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र आजही नागरीक याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसुन येत आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणे, काम नसताना मोटारसायकल घेऊन शहरात मोकाट फिरणे, चौकाचौकात विनाकारण गर्दी करून गप्पा मारत बसणे हा प्रकार नळदुर्ग शहरात सर्रासपणे घडत आहे. न.प.प्रशासन व पोलिस प्रशासन शहरात अशा मोकाट फिरणाऱ्या टवाळखोराना अनेकदा सांगुनही हे टवाळखोर ऐकत नव्हते भाजीमार्केटच्या बाहेर मोटारसायकलींची प्रचंड गर्दी होत असे सरकार किंवा प्रशासन नागरीकांच्या हितासाठी, नागरीकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी अहोरात्र काम करीत असताना केवळ अशा टवाळखोरांमुळे याला गालबोट लागत आहे. अशा टवाळखोरांमध्ये सुशिक्षित नागरीकांचा भरणा जास्त असणे ही अतीशय दुर्दैवाची बाब आहे. आज कोरोनामुळे अख्खे जग हतबल झालेले आहे असे असतांना सुशिक्षित नागरीकांकडुन लॉकडाऊनमधले नियम पाळले जात नसतीलतर ही बाब अतीशय दुर्दैवाची मानली पाहीजे. त्यामुळेच अशा टवाळखोरांना आळा घालण्यासाठी तसेच सध्या मुंबई व पुणे येथुन मोठयसंख्येने नागरीक विनापरवाना शहरात येत आहेत त्यांच्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने अशा नागरीकांना शहरात येण्यास मज्जाव करण्यासाठी दि.१८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार न.प.चे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी संपुर्ण नळदुर्ग शहर लॉकडाऊन करून टाकले आहे. गल्लीबोळातील रस्ते तसेच शहरातील प्रमुख रस्ते लाकडी दंटे लाऊन वाहतुकीसाठी बंद करून टाकले आहे. तवळखोरांना आळा घालण्यासाठी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी घेतलेल्या या निर्णयाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

 
Top