परंडा / प्रतिनिधी -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका हातावरिल पोट असलेले गोरगरीब झोपडीत राहणाऱ्या लोकांना बसला आहे. यात कांही लोकं मजुरी करून आपली उपजीविका भागवत होते.सद्यस्थितीला पोटासाठी भटकंती करता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने अशा ४०७ गोर-गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम तालूक्यातील सोनारी येथील माजी जि.प.सभापती वस्ताद नवनाथ जगताप यांनी आपल्या स्वःखर्चातुन केले आहे.
   गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तु,पीठ, तांदूळ, साखर,डाळ,गोड तेल,साबन वस्तू धान्य आदी वाटप करण्यात आले.जगासह देशात कोरोना या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे.या कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून शासनाने २१ दिवसाचे लॉकडाउनची घोषणा केली आहे.त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या गोर-गरीब मजुरांचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासत असल्याने माणुसकीचे एक पाऊल पुढे करत दिलदार जि.प.सदस्य वस्ताद नवनाथ जगताप यांनी स्वःखर्चातून जीवनावश्यक वस्तु ४०७ गरीब व गरजूंना वाटप केले आहे.
जिवनावश्यक वस्तुचे वाटप करत असताना सोशल डिस्टिंगचे काटेकोरपणे पालन करून यावेळी खबरदारीचे उपाय योजण्यात आलेहोते.
      नागरिकांनी कोरोना रोगाला घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या वेळोवेळी सूचनांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे  गरजेचे आहे.तसेच जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवहान दानशूर जि.प.सदस्य नवनाथ (अप्पा )जगताप यांनी केले आहे,
 
Top