परंडा / प्रतिनिधी : -
 कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर खबदारी म्हणून २३ मार्च पासून राज्यात संचारबंदी व देशातही लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक चणचण भासू लागली त्यात मार्च अखेर महिना असल्याने नौकरदार पेन्शनधारक,निराधार लोकांच्या पगारी उशिरा बँकेत जमा झाल्याने परंडा येथील एसबीआय बँके समोर पेन्शनधारकांनी व निराधार वेतन धारकांनी मंगळवारी रोजी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.
तर प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे अवाहन  करण्यात आले होते.मात्र त्याला नागरिकाकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखविली जात आहे.
सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी १ मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे असते परंतू परंडा येथील राष्ट्रीयकृत एसबीआय बँकेसमोर पेन्शनसाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी करून टाकली व सोशल डिस्टन्सिंग मियमाचे अल्लंघन करीत आहे.
 जिल्हा प्रशासनाकडून व न.प.कडून दररोज ध्वनीद्वारे जागरूक करत असतानाही अनेकांनी पगारीसाठी गर्दी केली.विशेष म्हणजे यामध्ये सुशिक्षीत नागरिक, कर्मचारी ही शासनाच्या सुचनांकडे कानाडोळा करून गर्दीसाठी पुढाकार घेताना दिसून येत आहे.
देशात कोरोना (कोविड- १९) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने सतत होत असलेली वाढ पाहता या महामारीला रोखण्याकरिता उपाय योजनेत हलगर्जीपणा झाल्यास सर्वांनाच त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.तर गर्दी पाहूण बँक कर्मचारी, पोलीस कर्मचारी झाले हतबल तर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामुदायिक जबाबदारी सांभाळणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा गंभीर बाबीकडे बँक सुरक्षा गार्ड व पोलीसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
 
Top