उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 कोरोना विषाणुच्या पाश्र्वभुमीवर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन दुकानात मोफत धान्यासह अनेक सुविधा निर्मा करुन दिल्या आहेत. परंतु जिल्हयात अनेक नागरिकांचे रेशन कार्ड ऑनलाईन नाहीत तसेच बहुतांश नागरिकांना रेशन कार्डच नाहीत. त्यामुळे अशा नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणुन शासनाने कोणत्याही अटी न लावता रेशन दुकानातील धान्य देण्यात यावे अशाी मागणी माजी जिल्हापरिषद सदस्य तथा भाजपा जिल्हाउपाध्यक्ष रामदास कोळगे यांनी गुरुवारी (दि.16) रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या संपूर्ण भारतभर कोरोनाची जागतिक महामारी सुरु असल्यामुळे गेल्या 20 मार्च 2020 पासून संपुर्ण भारतात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे त्यामंुळे भारतातील लोकांना आपल्या देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी रेशनवर मोफत धान्यासह अनेक सुविधा निर्माण करुन दिल्या आहेत. परंतु अनेक रेशनकार्डधारकांचे रेशन कार्ड ऑनलाईन न केल्यामुळे त्यांना रेशन दुकानातुन रेशनचा माल मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची  वेळ आलेली आहे. तसेच अनेक नागरिकांना रेशनकार्डच नसल्यामुळे त्यांना रेशन दुकानातील माल मिळत नाही.ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पण ते ऑनलाईन न झाल्यामुळे रेशनचा माल मिळत नाही तर ज्यांना रेशन कार्डच नाही तेही नागरिक रेशन दुकानाच्या मालापासून वंचीत आहेत. पर्यायाने अशा नागरिकांची प्रचंड उपासमारी होत आहे.त्यामुळे या परिस्थितीचा गांभीर्यपुर्वक विचार करुन  शासनाने त्यांना त्वरीत कोणत्याही अटी विना रेशन दुकानातील माल देऊन त्यांची उपासमार थांबवावी व त्यांना आधार दयावा अशी मागणी श्री कोळगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
 
Top